कमल हासन यांचा ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर !

‘इंडियन 2’ हा चित्रपट २३ वर्षांपूर्वी आलेल्या कमल हासन यांच्या ‘इंडियन’चा सीक्वल आहे. या सीक्वलमध्येही कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत.

पण ताजी बातमी खरी मानाल तर  ‘इंडियन 2’ बंद होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाच्या बजेटवरून दिग्दर्शक शंकर व निर्मात्यांत वाद झाल्यामुळे ‘इंडियन 2’च्या शूटींगमध्ये अडचणी येत असल्याचे कळतेय.

मिळालेल्या महितीनुसार, शंकर आणि लाईका प्रॉडक्शन यांच्यात ‘इंडियन 2’च्या बजेटवरून मतभेद वाढले आहेत. हे मतभेद इतके टोकाला पोहोचलेत की, निर्माते या चित्रपटातून अंग काढून घेण्याच्या विचारात आहेत. तूर्तास या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पण लाईका व शंकर यांच्यापैकी कुणीही या वृत्ताचे अद्याप खंडन केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like