अशी घेतेय कल्की आपल्या मुलीची काळजी

अभिनेत्री कल्की यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आई झाली. यानंतर ती आपल्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. आपल्या मुलीची काळजी घेणारी कल्कीने अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलीला झोपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते.कल्कीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती गिटार वाजवताना दिसत आहे आहे आणि तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे.

या पोस्टसह, कल्कीने पोस्ट केले की, मला संगीताचा अनुभव नाही, पण ही तमिळ अंगाई तिच्या झोपेमध्ये खूप मदत करते.’कल्की आणि तिचा प्रियकर गाय हर्शबर्गने आपल्या मुलीचे नाव सैफो असे ठेवले आहे. या जोडप्याने अद्याप लग्न केलेले नाही. यापूर्वी, कल्कीने अनुराग कश्‍यप यांच्याशी 2011 मध्ये लग्न केले होते आणि 2015मध्ये दोघे विभक्‍त झाले होते.

ती अखेरच्या वेळी दिग्दर्शक झोया अख्तरच्या “गली बॉय’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबतही महत्त्वपूर्ण भूमिका तिने साकारली होती.

 

You might also like