शस्त्रक्रियेनंतर अशी दिसते काजोलची आई

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा सध्या आजारी आहेत. काही दिवसांपूर्वी पोटदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यांनतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तनुजा घरी परतल्यानंतर  काजोलने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या प्रचंड वेगळ्या दिसत असून त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.

आजारपणामुळे त्रस्त असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य झळकत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं जाणवताना दिसत आहे.

 

You might also like