‘Kabir Singh’ च्या यशात वाढ, शाहिदच्या मानधनातही वाढ…

अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा सिनेमा कबीर सिंगमुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमानं प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं आणि या सिनेमानं 2 आठवड्यातच 200 कोटींचा पल्ला पार केला. या सिनेमाच्या यशाचा फायदा अर्थातच शाहिद कपूरलाही झाला आहे. या सिनेमानंतर शाहिदनं त्याचं मानधन वाढवल्याचं बोललं जात आहे. पण आता शाहिद यानंतरच्या सिनेमांसाठी किती मानधन घेणार याचाही खुलासा झाला आहे.

कबीर सिंगच्या प्रमोशन दरम्यान शाहिदनं त्याच्याकडे इतर कोणताही सिनेमा नसल्याचं आणि त्याला काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं. मात्र या सिनेमाच्या यशानंतर सर्व गणितं बदलली आणि शाहिद मार्केट व्हॅल्यू वाढली. त्यामुळे शाहिदनं सुद्धा त्याच्या मानधनात वाढ केली असून यानंतरच्या सिनेमांसाठी तो तब्बल 35 कोटींचं मानधन घेणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शाहिदनं मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.