माझ्या बायोपिकमध्ये त्यानंच काम करावं, त्याच्याइतकं मला कोणीही ओळखू शकत नाही

एका मुलाखतीदरम्यान आमिर खानला त्याच्या बायोपिकबद्दल विचारण्यात आलं यावर ‘माझ्यावर आधारित बायोपिक यायाला बराच अवधी आहे’ असं हसून उत्तर आमिरनं दिलं.  ‘पण जर माझ्यावर बायोपिक आलाच तर माझा मुलगा जुनेद खान हा त्यासाठी उत्तम अभिनेता ठरेल. माझ्या बायोपिकमध्ये त्यानंच काम करावं कारण त्याच्याइतकं कोणीही मला ओळखू शकत नाही. माझ्या बायोपिकसाठी तोच योग्य ठरेल’ असंही आमिर म्हणाला.

आमिरचा मुलगा जुनेद हा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्यासाठी योग्य स्क्रिप्टच्या शोधात आम्ही आहोत अशीही माहिती आमिरनं दिली.

महत्वाच्या बातम्या –

You might also like