‘जजमेंट’ चित्रपटातील गाणं प्रदर्शित

‘जजमेंट’ या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्यानंतर आता या चित्रपटालं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे आंतराष्ट्रीय मातृ दिनाच्या निमित्ताने हे गाणं खास प्रदर्शित करण्यात आलं आहे.

मुलीचा जन्म प्रत्येक आईसाठी खूप महत्वाचा असतो. गोड नात्यावर भाष्य करणारं तुझ्या सोबतीला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गाण्यामध्ये आई तिच्या दोन चिमुकल्यांना जीवनाकडे आशावादी नजरेतून पाहण्याची शिकवण देताना दिसत आहे.

या भावनिक गाण्याला आनंदी जोशी हिने स्वरबद्ध केले असून, नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मंदार चोळकर यांनी अगदी समर्पक शब्दांत आई आणि मुलीचे नाते मांडले आहे.

 

You might also like