अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’चा ट्रेलर रिलीज
अक्षय कुमार याच्या आगामी ‘जॉली एल एल बी २’ या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. अखेर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला असून यातील अक्षय कुमारच्या कामाचं कौतुक होताना दिसत आहे. तर सिनेमाची स्टोरीलाईनही उत्सुकता वाढवणारी आहे. पुढच्या वर्षी १० फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
‘जॉली एल एल बी२’ या सिनेमाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं. अक्षय कुमार यात मुख्य भूमिका करत असून वकीलाच्या भूमिकेत अक्षय कुमार असून तो कोर्ट रुममध्ये कुणाला न्याय देतो आणि कसा देतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
अक्षय कुमार याच्यासोबत अनू कपूर, हुमा कुरेशी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. ‘जॉली त्याची सर्वात मोठी केस लढण्यासाठी आला आहे’ अशा कॅप्शनसह अक्षयने सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर ट्वीट केले आहेत.
https://youtu.be/kvjxoBG5euo