जॉन अब्राहमच्‍या ‘रोमियो अकबर वॉल्टर’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

जॉन अब्राहम आता एका नवीन चित्रपट दिसणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. ‘रोमियो अकबर वॉल्टर’ (RAW) असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्‍टर ट्विटरवरून प्रदर्शित केले आहे. या पोस्‍टरमध्‍ये जॉन सिगारेट ओढताना दिसत असून तो ७० च्या दशकातील हिरो असल्यासारखे वाटत आहे.आज म्हणजेच २५ जानेवारी रोजी  या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित आहे असून हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी रिलीज होणार आहे. जॉनबरोबर या चित्रपटात मौनी रॉय, जॉकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमुर्ति आणि सिकंदर खेर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे.
You might also like