जॉन अब्राहमच्या ‘बाटला हाऊस’चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आले. एखाद्या घटनेबद्दल सामान्य प्रेक्षकांना असलेलं कुतूहल, न ऐकलेली बाजू पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. असाच एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येत आहे.

२००८ साली दिल्लीतील ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला चित्रपट ‘बाटला हाऊस’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेता जॉन अब्राहम यानं नुकतीच सोशल मीडियाद्वारे माहिती देत ‘बाटला हाऊस’चं टीझर लाँच केलं आहे.

You might also like