“तक्रार करण्यापेक्षा काम करा”

सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. या घराणेशाहीच्या वादात आता  जॉन अब्राहम याने उडी घेतली आहे. “एकतर काम करा किंवा घरात बसून दुसऱ्यांवर टीका करा”, असं प्रत्युत्तर त्याने टीकाकारांना दिलं आहे.

“प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल हे करावंच लागतं. स्टार किड्सला देखील चित्रपट उद्योगात टिकून राहण्यासाठी मेहनत करावीच लागते. अन्यथा प्रेक्षक त्यांना दिर्घकाळ सहन करत नाही. तुमच्याकडे दोनच पर्याय असतात, करिअर करायचं असेल तर घराबाहेर पडा आणि काम करा. किंवा घरात बसून इतरांवर टीका करा.

मी पहिला पर्याय स्विकारला. मॉडलिंग करुन मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी मी एक आऊटसायडर होतो. आज जवळपास २० वर्ष मी काम करतोय. अडथळे तर येतातच पण तक्रारी करुन काहीही सिद्ध होत नाही.” अशी प्रतिक्रिया जॉन अब्राहम याने दिली.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like