‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर

‘जिवलगा’ ही मालिका नुकतीच सुरू झाली. पण अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.  सध्या ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे.

या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी  कल्पना असली तरी आता याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी विश्वास आणि काव्या काय निर्णय घेतात याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जिवलगा’ या मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.