गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचं चित्रीकरण रद्द

कारगिल युद्धात महत्वाचे योगदान देणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित लवकरच बायोपिकची निर्मिती होणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर ही गुंजन सक्सेना यांची भूमिका वठविणार आहे. सध्या या बायोपिकचं लखनौमध्ये चित्रीकरण सुरु होतं. मात्र हे चित्रीकरण मध्येच थांबविण्यात आल्याचं समोर आलं आहे.
खराब हवामानामुळे हे चित्रीकरण मध्येच थांबवावं लागलं आहे. हवामान खात्याने वातावरणामध्ये बदल होणार असल्याची शक्यता यापूर्वीच वर्तविली होती. त्यामुळे चित्रपटाच्या टीमने चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या चित्रीकरणामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत.