‘गुंजन सक्‍सेना’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

जान्हवी कपूरचा आगामी “गुंजन सक्‍सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ही माहिती जान्हवीने तिच्या दिली आहे. जान्हवीने पोस्ट केले की, भारतातील पहिल्या महिला वायुसेनेच्या युद्धावर गेलेल्या मुलीची कहाणी आपल्यासमोर सादर करतना मला अभिमान वाटतो आहे. मला आशा आहे की, ज्या प्रवासाने मला प्रेरणा मिळाली त्या मार्गानेच तुम्हालाही प्रेरणा मिळेल. “गुंजन सक्‍सेना – द कारगिल गर्ल” 12 ऑगस्टला  प्रदर्शित होणार आहे.

जान्हवी कपूरने चित्रपटाचे पोस्टर आणि फोटोही शेअर केला आहे. “गुंजन सक्‍सेना : द कारगिल गर्ल’ ही भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलट गुंजन सक्‍सेना यांच्या आयुष्यापासून प्रेरित असून त्यात जान्हवीने मुख्य भूमिका साकारली आहे. 1999च्या कारगिल युद्धात सक्‍सेनाने युद्ध क्षेत्रात प्रवेश करत शत्रुवर हल्लाबोल केला होता. शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रझा यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

You might also like