जान्हवी कपूरने कुटुंबाविषयी सांगितले एक खास सिक्रेट

जान्हवी कपूरने धडक या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केली. धडक नंतर जान्हवी तख्त या चित्रपटात झळकणार आहे. जान्हवी आज अभिनेत्री बनली असली तरी ती आजही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या कुटुंबियांकडून सल्ला घेते.

जान्हवी कपूरसाठी तिचे कुटुंब हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्या कुटुंबातील एक सिक्रेट नुकतेच जान्हवीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे.

जान्हवी सांगते, डॅडस किड्स नावाचा आमचा व्हॉटसअॅप ग्रुप असून यात माझे बाबा, मी, खुशी, अंशुला दिदी आणि अर्जुन भैय्या आहोत. मी माझ्या आऊटफिटचे फोटो, तसेच वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो या ग्रुपमध्ये पाठवत असते. माझे आऊटफिट चांगले वाटत आहेत का हे मी माझ्या वडिलांना आवर्जून विचारते. त्यांना आऊटफिट चांगले वाटले तरच मी त्यात कर्म्फटेबल असते. माझ्या वडिलांचा आणि भावंडाचा सल्ला माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like