रणबीर-कतरिनाच्या ‘जग्गा जासूस’चं पहिलं पोस्टर रिलीज

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ‘जग्गा जासूस’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण अडकले होते. त्यामुळे त्यांचा हा चित्रपट येणार की नाही यावर शंका व्यक्त केली जात होती. अनुराग बसू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ पुढील वर्षी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

‘जग्गा जासूस’च्या या पोस्टरमध्ये रणबीर-कतरिना हे शहामृगाची सवारी करताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी म्हणजे जरी हे दोघं ख-या आयुष्यात एकत्र नसले तरी या चित्रपटाच्या पोस्टरवर का होईना ते एकत्र दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती करणा-या ‘यूटीव्ही मोशन पिक्चर्स’ने ट्विट केलेय की, ‘कधी कधी लवकर पोहचण्यासाठी शाहमृग उत्तम सवारी आहे. उद्या जग्गाच्या दुनियेत प्रवेश घेण्यास सज्ज व्हा,’ असे म्हणत त्यास #JaggaJasoos #RanbirKapoor #KatrinaKaif हे हॅशटॅगही दिले आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जग्गा जासूस’च्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण आणि थरार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी, आपण कधीही न पाहिलेला रणबीर यात आपल्याला दिसेल. यूटीव्ही मोशन पिक्चरने ट्विटर हॅण्डलवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. “अनेकदा पळ काढण्यासाठी शहामृगाची स्वारी हा सर्वात वेगवान मार्ग असू शकतो,” असं लिहिलं आहे.

View image on Twitter
You might also like