जॅकलिन फर्नांडिसचा कोरोना अहवाल आला….

बॉलिवुडमधील शुटींगची कामे पुन्हा रुळावर येत असली तरी सगळीकडे आवश्‍यक ती काळजी घेऊनच चित्रीकरण व इतर कामे केली जात आहेत. त्यातच आघाडीची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या शूटींग टीममधील दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची इन्स्टाग्राम पोस्ट टाकल्याने काळजी वाढली होती. मात्र स्वतः जॅकलिनचा अहवाल मात्र निगेटिव्ह आल्याने तिने सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

यासंदर्भात इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, आम्ही न्यू नॉर्मलचे सर्व नियम पाळून आणि आवश्‍यक ती सर्व खबरदारी घेऊन शुटींगला सुरवात केली होती. शुटींगच्या सर्व क्रू मेंबर्सची चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने त्यातील दोघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आम्ही शूटिंग पुढे ढकलले आहे. आमच्यासाठी टीममधील प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे.

करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले दोघेही सध्या स्व विलिगीकरणात असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. टीममधील बाकीचे सदस्य आणि माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. असे असले तरी आम्ही सगळे आवश्‍यक ती काळजी घेत असून सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आहोत. त्यासाठी मी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते.

जॅकलिन सध्या सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतम यांच्या भूमिका असलेल्या भूत पोलिस चित्रपटात काम करत असून त्याखेरीज किक-2 या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे.

 

You might also like