ईशा देओल पुन्हा होणार आई, डोहाळे जेवणाचे फोटो व्हायरल

ईशा देओल पुन्हा आई होणार आहे. तिने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिचे हे फोटो इन्टरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत.  ईशा आणि भारत यांच्या घरी २३ ऑक्टोबर रोजी चिमुकलीचे अगमन झले होते. आता दोन वर्षांनंतर त्यांच्या घरी एका नवीन पाहुण्याचे अगमन होणार आहे.

ईशाने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, ‘तब्बल दोन वर्षांनंतर मी हा क्षण पुन्हा अनुभवत आहे. मी माझ्या मित्रमंडळींचे आणि कुटुंबाचे आभार मानते, त्यांनी मला ही खास भेट दिली आहे.’