बिग बींच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयाने दिली माहिती

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल शनिवारी त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं. आता नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीतबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती आता व्यवस्थित आहेत. अमिताभ यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. रूग्णालयाच्या अलगीकरणाच्या विभागात अमिताभ यांना ठेवण्यात आलं आहे. अशी माहिती नानावटी रूग्णालयाच्या अधिकृत व्यक्तींकडून देण्यात आली आहे.

अमिताभ नंतर त्यांचा मुलगा अभिषेकही कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरून गेला आहे. राज्यात विक्रमी 8139 रुग्ण सापडले आहेत. तर 233 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 2 लाख 46 हजार 600 एवढा झाला आहे.

‘या’ अभिनेत्याच्या घरात केली कोरोनाने एन्ट्री

You might also like