बुधवारी औरंगाबाद आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा..

औरंगाबाद : नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभगीय केंद्र औरंगाबाद आयोजित सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. ९ जानेवारी २०१९ रोजी सायं. ६ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे.

हिंदी चित्रपट सृष्टीतील अग्रगण्य दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध कन्नड चित्रपट दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना यंदाचा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन या सोहळ्यात गौरविले जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यापूर्वी हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील यावर्षी जन्मशताब्दी असणार्‍या  दिग्गजांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम नीरज वैद्य व श्रद्धा जोशी सादर करतील. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘कोल्ड वार’ ही पोलिश फिल्म ओपनिंग फिल्म म्हणून सादर होणार आहे.

गुरुवार, दि. 10 जानेवारी रोजी आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे स्क्रिन नं. 2 मध्ये सकाळी 10.15 वा. मंटो हा नंदीता दास दिग्दर्शीत हिंदी सिनेमा, दु. 1.30 वा. घटश्राद्ध हा गिरीश कासारवल्ली दिग्दर्शित कन्नड सिनेमा, दु. 3.30 वा. आम्रीत्यूम हा अरुप मन्ना दिग्दर्शित  आसामी सिनेमा, सायं. 5.30 वा. आम्ही दोघी हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित मराठी सिनेमा व सायं. 8.15 वा. कोल्ड वार या पोलिश सिनेमाचा रिपीट शो होणार आहे. स्क्रिन नं. 3 मध्ये स. 10 वा. वाईल्ड स्ट्रॉबेरीज हा इंगमार बर्गमन यांचा स्विडीश सिनेमा, दु. 12 वा. गांधी आणि सिनेमा या विषयावर अमरीत गांगर यांचे विशेष व्याख्यान, दु. 3 वा. अब्बु हा अर्षद खान दिग्दर्शित कॅनडियन सिनेमा, सायं. 4.45 वा. शॉर्ट फिल्म स्पर्धेचे विशेष शो व सायं. 7.30 वा. सिन्सीअरली युवर्स ढाका ही अकरा दिग्दर्शकांच्या अकरा कथा असलेली बांग्लादेशी फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.

शुक्रवार, दि. 11 जानेवारी रोजी आयनॉक्स स्क्रिन नं. 2 येथे स. 10.15 वा. रवि जाधव दिग्दर्शित न्युड हा मराठी सिनेमा, दु. 12.30 वा. ऍश इज प्युअरेस्ट व्हाईट हा चायनिज सिनेमा, दु. 3 वा. कामाख्या सिंग दिग्दर्शित भोर हा सिनेमा, सायं. 4.45 वा. आरोन हा ओंकार शेट्टी दिग्दर्शित मराठी सिनेमा, सायं. 7 वा. अण्डरपॅँट्स थिप हा श्रीलंकन सिनेमा, तर स्क्रिन नं. 3 येथे स. 10 वा. इंगमार बर्गमन दिग्दर्शित द सेव्हन्थ सिल हा स्विडीश सिनेमा, दु. 11.45 वा. थिंकींग ऑफ हिम हा अर्जेंटीना इंडिया सिनेमा, दु. 2 वा. परसोना हा इंगमार बर्गमन दिग्दर्शित स्विडीश सिनेमा. दु. 3.45 वा. द स्विट रिक्वीयम हा रीतू सरीन व टेंगझीन सोनम दिग्दर्शित इंडो-यु.एस.ए. फिल्म, सायं. 5.45 वा. एम.जी.एम. फिल्म आर्ट शॉर्ट फिल्म शो, रात्री 8.15 वा. द बॅड पोएट्री टोकियो हा अंशुल चौहान दिग्दर्शित जपानी फिल्म दाखविल्या जाणार आहे.

शनिवार, दि. 12 जानेवारी रोजी आयनॉक्स स्क्रिन नं. 2 स. 10.15 वा. अब्यक्तो हा अर्जुन दत्ता दिग्दर्शित बंगाली सिनेमा, दु. 12.30 वा. लव्हलेस हा अ‍ॅण्ड्यू झ्वांगस्तेव दिग्दर्शित बहुभाषिक सिनेमा, दु. 2.45 वा. पेंटींग लाईफ हा बिजुकुमार दामोधरन् दिग्दर्शित इंडो-युएसए सिनेमा, सायं. 5.30 वा. बंदीशाळा हा मिलिंद लेले दिग्दर्शित मराठी सिनेमा, रात्री 8.30 वा. ऍश इज प्युअरेस्ट व्हाईट या सिनेमाचा रिपीट शो दाखविल्या जाणार आहे. तर स्क्रिन नं. 3 येथे स. 10 वा. सॅराबॅण्ड हा इंगमान बर्गमन दिग्दर्शित स्विडीश सिनेमा, दु. 12.15 वा. भूवन शोमे हा मृणाल सेन दिग्दर्शित हिंदी सिनेमा, दु. 2 वा. विथ मोबाईल फोन-एव्हरीवन इज अ फिल्ममेकर या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, अमरजीत आमले, बकेट लिस्ट सिनेमाचे दिग्दर्शक तेजस देऊसकर, चित्रपट समिक्षक अमोल उदगीरकर व शिव कदम आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर दु. 4.15 वा. व्हॉट विल पिपल से ही इरमान हक दिग्दर्शित बहुभाषिक फिल्म, सायं. 6.15 वा. नावाजलेलेल्या शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन, रात्री 9 वा. गुड लक अल्जेरिया ही फ्रेंन्च-बेल्जीयम फिल्म प्रदर्शित केली जाणार आहे.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे रविवार, दि. 13 जानेवारी आयनॉक्स स्क्रिन नं. 2 येथे स. 10.45 वा. द स्विट रिक्वीयम ही रीतू सरीन दिग्दर्शित इंडो-युएसए फिल्म, दु. 12 वा. तलान ही कझाकिस्थान देशातील फिल्म, दु. 2 वा. टेंपेटे ही फ्रेंच फिल्म दाखविली जाईल. तर स्किन नं. 3 येथे स. 10 वा. ऑटम्न सोनाटा ही इंगमार बर्गमन दिग्दर्शित फिल्म, दु. 12 वा. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा शॉर्ट फिल्म मास्टर क्लास, दु. 2.30 वा. जोहार मायबाप ही राम गबाले दिग्दर्शित मराठी फिल्म दाखविली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –