कोणत्याही प्रकारे असो… पण मला अर्जुनच आवडतो.

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण त्याआधी एक खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या भागात करण जोहरसोबत आपल्याला काही परीक्षक देखील दिसणार आहेत.

या ज्युरी मेंबरमध्ये मलाईका अरोरा, किरण खेर, वीर दास आणि मल्लिका दुआ यांचा समावेश आहे. हे सगळे मिळून या कार्यक्रमात आलेल्या काही सेलिब्रेटींना कॉफी अॅवॉर्ड देणार आहेत. करण सगळ्या ज्युरी मेंबर्सना विचारतो की, या सिझनमध्ये पुरुष सेलिब्रेटींमध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स कोणाचा होता? यावर क्षणाचाही विलंब न करता किरण खेर अर्जुन कपूर हे नाव घेतात. त्यावर मल्लाईका लगेचच उत्तर देते की, कोणत्याही प्रकारे असो… पण मला देखील अर्जुनच आवडतो.

 

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like