“ये रे ये रे पैसा २” या चित्रपतील ‘अश्विनी ये ना’ गाणं प्रदर्शित

“ये रे ये रे पैसा २” या चित्रपटातून ‘अश्विनी ये ना’ गाणं रसिकांपुढे येत आहे. मुंबईत झालेल्या शानदार सोहळ्यात “ये रे ये रे पैसा २”चं म्युझिक लाँच करण्यात आलं. या वेळी अशोक सराफ, चारुशीला साबळे, सचिन पिळगांवकर उपस्थित होते.
“ये रे ये रे पैसा २” या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. तर पटकथा आणि संवाद लेखन हृषिकेश कोळी आणि हेमंत ढोमे यांचं आहे. गायक अवधूत गुप्ते आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात अश्विनी ”ये ना हे” गाणे स्वरबद्ध करण्यात आले. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.