कंगना झाशीची राणी तर मग विवेक ओबेरॉय हे मोदी आहेत…

महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.
तर कंगना समर्थकांनी तिला ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ‘ यांची उपाधी देखील दिली आहे. कंगनाने राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित मणिकर्णिका या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारली होती. शिवसेनेसोबत सुरु असलेल्या संघर्षामुळे तिला थेट राणी लक्ष्मीबाई असे संबोधले जाऊ लागले आहे.
यावरून आता प्रकाश राज याने एक फोटो ट्विट केला असून #justasking अशी पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये “जर एका चित्रपटाने कंगनाला राणी लक्ष्मीबाई झाल्याचे वाटत असेल तर दिपिका पद्मावती आहे, हृतिक अकबर, शाहरुख खान अशोका, अजय भगतसिंग, अमीर मंगल पांडे आणि विवेक मोदी जी आहे” असा उपरोधिक टोला त्यांनी या ट्विटमधून प्रकाश राज यांनी लगावला आहे.
Yes… New INDIA #justasking https://t.co/yAWVkNJkWY
— Prakash Raj (@prakashraaj) September 9, 2020