‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये झळकणार ‘हा’ अभिनेता

‘भुलभुलैय्या’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल लवकरच तुमच्या भेटला येणार आहे.  या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. आता कार्तिकसह आणखी एक अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे.

एका वृत्तानुसार, अक्षय कुमार चित्रपटात एक खास भूमिका साकारणार आहे. परंतु चित्रपट निर्मात्यांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘भुलभुलैय्या’च्या सीक्वलमध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा डॉक्टर आदित्य श्रीवास्तवच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. विद्या बालनची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याविषयी अजून कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही.