‘८३’चित्रपटा मध्ये साहिल खट्टरची वर्णी, साकारणार ‘या’ क्रिकेटरची भूमिका

क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार असून माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे.

कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे. या चित्रपटामध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे.

साहिल हा युट्युबर, सूत्रसंचालक आणि अभिनेता आहे. दरम्यान, आता एक-एक करत चित्रपटातील भूमिकांवरील पडदे दूर होत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like