सुशांत सिंहला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर !

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आहे. अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हवां होता, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे.

२०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला सन्मानित केलं जाणार आहे. मात्र या पुरस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सुशांतला मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.

याआधी त्याचा कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून सन्मान करण्यात आला होता. याची माहिती सुशांत बहिण श्वेता सिंहने दिली होती. हा सन्मान देखील त्याला मृत्यूनंतर मिळाला.

You might also like