ऋषी कपूर यांच्याकडून महत्त्वाचा खुलासा

ऋषी कपूर यांनी अखेर त्यांच्या आजारपणाविषयीचीह महत्त्वाची माहिती सर्वांसमोर उघड केली आहे. साधारण गेल्या वर्षी कपूर यांना दुर्धर आजाराने ग्रासल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ज्यानंतर ते उपचारासाठी परदेशी रवाना झाले. एकिकडे ते आजारपणावर उपचार घेत असतानाच दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांकडून मात्र या अडचणीच्या प्रसंगाची कोणतीच वाच्यता माध्यमांसमोर केली गेली नाही.

आता ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द कपूर यांनीच आजारपणाच्या काळावरुन पडदा उचलला आहे. ”माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि दिलेल्या सदिच्छांबद्दल मी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे आभार मानतो. आता मी पूर्णपणे बरा झालो आहे. कॅन्सरही पूर्णपणे नाहीसा होत आहे. असं असलं तरीही उपचाराची काही सत्र अद्यापही सुरुच आहेत’, असं ते म्हणाले. उपचारपद्धतीत काहीच अडचणी नाहीत, पण अडचणी आहेत ते म्हणजे त्याला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादामध्ये, असं म्हणत त्यांनी उपचाराविषयीही माहिती दिली.

 

You might also like