जर विवेक ओबेरॉयने नसती केली ‘ही’ चूक तर त्याची पत्नी असती ऐश्वर्या

ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्ड टायटल जिंकले होते. ऐश्वर्याच्या सौंदर्यासाठी लाखो लोक वेडे आहेत. पण अभिषेक बच्चनने ऐश्वर्याशी लग्न केले. अभिषेक बच्चनशी लग्न करण्यापूर्वी बॉलिवूडच्या दोन मोठे सुपरस्टार्स ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडले होते.त्यातील एक सुपरस्टार ऐश्वर्या रायसोबत लग्न करणार होता. पण त्याने मोठी चूक केली यामुळे ऐश्वर्या राय त्या सुपरस्टारशी लग्न करू शकली नाही.

हे दोन स्टार इतर कोणीही नसून सलमान खान आणि विवेक ओबेरॉय आहेत. या दोघांच्याही चुकीमुळे ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनची पत्नी झाली.  ऐश्वर्या सलमान खानला हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या सेटवर भेटली त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या खूप जवळचे झाले. सलमान खानने ऐश्वर्या रायला 2 वर्षे डेट केले. पण यावेळी सलमान खानने एक चूक केली ज्यामुळे त्यांचे संबंध तुटले.

सलमान खानने आणखी एका मुलीला डेट करण्यास सुरवात केली यामुळे ऐश्वर्या राय त्याच्यावर चिडली आणि तिने सलमान पासून दूर झाली. सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानंतर विवेक ओबरॉय ऐश्वर्याचा प्रियकर झाला. ऐश्वर्याला विवेक ओबेरॉयची साथ आवडू लागली होती. दोघे क्यों हो गया ना या चित्रपटात एकत्र दिसले.

विवेक ओबेरॉयला ऐश्वर्याला मदत करायची होती आणि म्हणूनच त्याने हॉटेलच्या रूममध्ये प्रेसला बोलावले आणि त्यांना सांगितले की सलमान खानने ऐश्वर्या रायला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ऐश्वर्या राय विवेक ओबेरॉयपासून दूरच राहू लागली आणि दोघांचे नाते तुटले. ऐश्वर्यासोबत मी असल्याने सलमानकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याची माहिती त्याने २००३ साली झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. सलमानने दारूच्या नशेत मला ४१ वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली अशी धक्कादायक माहिती त्याने दिली.

या पत्रकार परिषदेनंतर ऐश्वर्याने विवेकपासून दूर जाणेच पसंत केले. कोणत्याही वादविवादात अडकू नये म्हणून तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. ऐश्वर्या त्याला इग्नोर करू लागली आणि विवेकची वागणूक ही अत्यंत बालिश असल्याचेही तिने म्हटले होते.

 

You might also like