निर्णय कळवला नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल – असित कुमार मोदी

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपूर्वी दयाबेन मालिका करणार नसल्याची चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. सूत्रांच्या सांगण्यानुसार दिशाने निर्मात्यांसमोर काही आटी ठेवल्या होत्या. तेव्हा असित कुमार मोदी यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रीया दिल्या नाहीत मात्र आता त्यांनी दिशा मालिकेत दिसणार की नाही याचा खुलासा केला आहे.

निर्मात्यांच्या सांगण्यानुसार ‘आम्ही दिशाला हवा तेवढा वेळ दिला होता, महत्वाचे म्हणजे पैश्याची कोणतीही समस्या नाही, माझी टीम सतत दिशाच्या संपर्कात आहे. पण काही दिवसांत दिशाने तिचा निर्णय कळवला नाहीतर मला दिशाला रिप्लेस करावे लागेल. माझ्या मते कोणताही अभिनेता हा मालिकेपेक्षा मोठा नसतो.’

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like