फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर….

सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील काही  प्रश्न समोर आले. ज्या प्रश्नांच्या उत्तरासाठी अनेक बी- टाऊन कलाकार आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. कंगना राणौत हिसुद्धा त्याच कलाकारांपैकी एक. खुद्द कंगनाने या मुद्द्यावर काही गौप्यस्फोटही केले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत सुरु असणाऱ्या संघर्षादरम्यानच आता पुन्हा एकदा मुंबईतून काढता पाय घेतलेल्या कंगनानं महाराष्ट्र शासनावर टीकेची झोड उठवली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीपदाची धुरा असती तर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता असा सूर तिनं ट्विच्या माध्यमातून आळवला.

राज्यात सध्या सत्तेत असणारी भ्रष्ट सोनिया सेना जी माफियांना पाठिशी घालते, त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर मुंबई पोलिसांनी त्यांचं काम योग्य मार्गानं केलं असतं. नागरिक आणि जनतेला त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करावा लागला नसता’, असं तिनं लिहिलं. कंगनाचं हे ट्विट पाहता आता तिला नेमकं कोण आणि काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

You might also like