‘टकाटक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…..

‘टकाटक’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत आहे. समाजातील एखादा विषय गंमतीशीर शैलीत प्रेक्षकांसमोर मांडत त्यांना तो सहजपणे पटवून देण्याचा हातखंडा असणाऱ्या मिलिंद कवडे यांनी ‘टकाटक’मध्ये नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध कॅरेक्टर्समध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट २८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.