मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल – शांती प्रिया

बदलत्या काळानुसार चित्रपटसृष्टीची संकल्पना बदलत चालली आहे. वेगवेगळे विषय आणि कथानक चित्रपट दिग्दर्शक हाताळतांना दिसत आहेत.

त्यामुळे चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यातच मराठी चित्रपटांनादेखील आता सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शांती प्रिया सुद्धा मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडली असून तिला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचं तिने नुकतंच सांगितलं आहे.

” मला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल, सध्या मी चांगल्या आणि महत्वाच्या भूमिकांच्या शोधामध्ये आहे. मात्र ज्या क्षणी मला उत्तम भूमिका साकारण्याची संधी मिळेल. त्या क्षणी मी मराठी चित्रपटांमध्ये काम करेन”, असं शांती प्रियाने सांगितलं.