माझ्याविषयी खोटी माहिती पसरवली तर….

गेल्या काही दिवसांपासूनसेलिब्रिटींवर होत असलेल्या ड्रग्ज सेवनाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर करण जोहर याने संबंधितांना इशारा दिला आहे. माझ्याविरोधात खोटी माहिती पसरवल्यास प्रसारमाध्यमांनी कायदेशीर कारवाईला तयार राहावे, असे करण जोहरने म्हटले आहे.

करणने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, २८ जुलै २०१९ ला माझ्या घरी झालेल्या पार्टीत कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन झालेले नाही. क्षितीज प्रसाद आणि अनुभव चोप्रा या दोघांनाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही. मी स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही. मी अशा पदार्थांना प्रमोटही करत नाही. त्यामुळे माझ्याविषयी काहीही चुकीचे आरोप किंवा खोटी माहिती पसरवल्यास प्रसारमाध्यमांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे करण जोहरने म्हटले आहे.

या पार्टीसंदर्भात धर्मा प्रोडक्शनचे दिग्दर्शक क्षितीज प्रसाद यांचीही चौकशी करण्यात आल्याचे समजते. करण जोहर याने स्वत: या पार्टीचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या पार्टीमध्ये विक्की कौशल, दीपिका पादुकोण, झोया अख्तर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, रणबीर कपूर उपस्थित होते.

You might also like