‘मी कोणाचीही माफी मागणार नाही, फुकटचा माज मला दाखवू नये’

कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करणी सेनेचा आहे म्हणूनच करणी सेनेकडून कंगनाला लक्ष्य केलं जात आहे. करणी सेनेकडून येणाऱ्या धमक्यांना कोणत्याही प्रकारची भीक न घालता कंगनानं माझ्या मार्गात आलात तर एकालाही सोडणार असा धमकीवजा इशारा दिला आहे.
‘मी इथे कोणाचीही माफी मागायला आलेली नाही. फुकटचा माज मला कोणीही दाखवू नये. मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. राणी लक्ष्मीबाई या देशाच्या अभिमान आहेत त्यांची प्रतिमा मलिन होईल असं कोणतंही दृश्य चित्रपटात दाखवण्यात आलेलं नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही’ असं कंगनानं स्पष्ट करत पुन्हा एकदा करणी सेनेच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं आहे.
‘कंगनाने आमच्या कार्यकर्त्यांविरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर तिला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. तिच्या चित्रपटांचे सेट जाळून टाकू,’ अशी धमकी महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंग सेनगर यांनी दिली होती. ‘मणिकर्णिका २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
महत्वाच्या बातम्या –