मला सतत त्यांची आठवण येईल – माधुरी दिक्षित

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या ७१ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करीत आहेत.माधुरी दिक्षितने देखील सरोज खान यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे.

माधुरी आणि सरोज खान यांच्यामध्ये एक वेगळच नाते होते. सरोज खान यांनी माधुरीला बॉलिवूड डान्स शिकवला होता. माधुरीने ट्विट करत सरोज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझी चांगली मैत्रीण आणि गुरु सरोज खान यांच्या जाण्याने मला धक्काच बसला आहे. मला सतत त्यांची आठवण येईल’ असे म्हणत तिने ट्विटमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.

You might also like