मी कल्पना चावलाची भूमिका साकारू इच्छिते – वाणी कपूर

वाणी कपूर येत्या काही काळात बायोपिकमध्ये काम करू इच्छिते. विशेषत: अंतराळवीर कल्पना चावलाची भूमिका पडद्यावर साकारणे मोठा सन्मान होईल, असे तिला वाटते.वाणी म्हणते, “कल्पना चावला जगातील महिलांसाठी एक उत्तम आदर्श आहे. ज्या कोणालाही अंतराळवीर बनण्याचे स्वप्न आहे. त्यांच्याठी त्या एक प्रेरणा आहेत. यामुळे मला ते पात्र खरोखरच पडद्यावर करायचे आहे. वाणी म्हणाली, एक कलाकार म्हणून जोखीम घेण्यास आणि बायोपिकमध्ये नशीब आजमावण्यास आवडेल. तसेच इतर शैलींमध्येही प्रयोग करायला आवडेल.

मला ज्या कोणत्या भूमिका आल्या आहेत, त्यापैकी मी सर्वोत्कृष्ट निवडण्याचा प्रयत्न केला आहे. मला इंडस्ट्रीतील काही सर्वोत्कृष्ट लोकांसोबत काम करण्याचा आनंद मिळाला आहे.

मला वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. “शुद्ध देसी रोमान्स’, “वॉर’ आणि “शमशेर’ या चित्रपटात विविधांगी भूमिका साकारण्यास मिळाल्या आहेत.
यापुढेही ऍक्‍शन, कॉमेडी, रोमॉंटिक-कॉमेडी, ड्रामा, सस्पेन्स, थ्रिलर आणि वैविध्यपूर्ण भूमिकेचा भाग व्हायला आवडेल, असे वाणी म्हणाली.

You might also like