मला एक समलैंगिक प्रेमसंबंधावर चित्रपट तयार करायचा आहे – करण जोहर

करण जोहर लवकरच समलैंगिक नातेसंबंधांवर चित्रपट तयार करणार आहे. त्यात तो बॉलीवूडमधल्या दोन मोठ्या अभिनेत्यांना कास्ट करणार असल्याचे त्याने दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये चर्चेदरम्यान सांगितले आहे. तसेच तो स्वत: देखील या चित्रपटात काम करणार आहे असून ‘तख्त’ नंतर तो या चित्रपटाच्या कामाला लागेल असे बोलले जात आहे.

करण जोहरला एलजीबीटीक्यू समूदायासाठी तुला काय करायला आवडेल असा प्रश्न या फोरममध्ये विचारण्यात आला होता. ‘फिल्ममेकर असल्या कारणाने मला या विषावर एक चित्रपट तयार करून त्यातून मी या समूदायाच्या समस्या दाखवू शकतो. मला एक समलैंगिक प्रेमसंबंधावर चित्रपट तयार करायचा आहे. त्यात मी दोन मोठ्या अभिनेत्यांना घेऊ इच्छित आहे. अजून याबाबत काहीच निश्चित झालेले नाही. कोणते कलाकार या चित्रपटात असतील हे देखील ठरलेले नाही. पण हे नक्की की मला असा चित्रपट तयार करायचा आहे. मला एलजीबीटीक्यू समूदायाच्या विषयांना बॉलीवूडमध्ये मुख्य प्रवाहात आणायचे आहे’, असे करणने यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

You might also like