मला सर्व प्रकारचे चित्रपट करायचे आहेत – अलाया

अभिनेत्री अलाया एफ म्हणाली, माझी यथासंभव सर्वोत्कृष्ट प्रयत्न करण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत स्वतःला परिपूर्ण समजणे मला मान्य नाही. अलाया म्हणाली, मला सर्व प्रकारचे चित्रपट करायचे आहेत.

प्रत्येकजण मला सांगते की हे उत्तर; अगदी मुत्सद्दी आहे, पण मी शपथ घेते की चित्रपटांदरम्यान मी कधीही एखादी विशिष्ट गोष्ट निवडू शकेन, असे मला वाटत नाही. मला सर्व प्रकारचे चित्रपट करायचे आहेत आणि असे करण्याची क्षमता माझ्याकडे आहे, असे मला वाटते.

अलाया म्हणाली, मी कोणत्याही प्रकारे स्वत:ला परिपूर्ण वाटू इच्छित नाही, स्वत:ला नेहमी आव्हान द्यायचं आहे, माझ्या मर्यादेवर जोर देत राहायचं आहे. मी हे किती चांगल्या प्रकारे करू शकते हे पाहायचं आहे.

जवानी जानेमनमधील माझ्या अभिनयाचे कौतुक झाले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी अशीच अपेक्षा ठेवते. शैली किंवा दिग्दर्शक कोणीही असले तरी मला त्यामध्ये माझी सर्वोत्कृष्ट भूमिका द्यायची आहे, असे तिने सांगितले.

You might also like