कंगना रणौतचा एक व्हिडीओ व्हायरल

कंगना रणौत सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रचंड चर्चेत आहे. “बॉलिवूडमधील ९० टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. त्यामुळे शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी त्यांची ड्रग्स टेस्ट करा, असा खळबळजन आरोप कंगनाने केला होता. तिच्या आरोपांना प्रत्युत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

“मी घरातून पळाले होते. दिड-दोन वर्षात मी एक फिल्म स्टार झाले. त्याच वेळी मला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. माझी अवस्था खूप विचित्र झाली होती. मी वाईट लोकांच्या संगतीत होते.” असा अनुभव कंगनाने या व्हिडीओमध्ये सांगितला आहे.

“मी आयुष्यात कधीही ड्रग्सचं सेवन केलं नाही, मी ड्रग्स टेस्ट द्यायलाही तयार आहे” असं कंगनाने इतर कलाकारांवर आरोप करताना म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर तिचा हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काही तासांत शेकडो यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like