‘मी हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी साकारला’

‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना एकत्र अनुभवता येणार आहे.
खुद्द अक्षय कुमारने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये,’मी हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी साकारला आहे. मला आशा आहे की ‘मिशन मंगल’ चित्रपट जेवढा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, तेवढाच त्यांना प्रेरित सुद्धा करेल.’ असे त्याने लिहिले आहे.