बाळासाहेबांचे चिरंजिव एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या इशार्यावर महाविकास आघाडी निर्माण झाली. खुर्चीसाठी वाट्टेल ते करण्यात बाळासाहेबांचे चिरंजिव म्हणून ओळख असलेले उद्धव ठाकरे एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते.
कंगणा राणावत या अभिनेत्रीने केलेल्या टीकेनंतर तिचे कार्यालय पाडणे ही बाब या शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंक लावणारी आहे. या राज्यात आता ठाकरे सरकारची ठाकुरकी चालणार नाही, अशी व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खा. सुरेश वाघमारे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार कोरोनासारखी महामारी सोडून आत्महत्या करणारा चित्रपट अभिनेता सुशांत सिंग आणि आता अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यावरील आरोप प्रत्यारोपामागे फिरते आहे. चंदेरीदुनियेत हरवून असलेले काही नेते यात अडकून असल्याने राज्य सरकारचे धाबे दणावले आहेत, असेही वाघमारे यांनी कळविले. आज सुडबुद्धीतून केलेल्या कारवाहीचा आपण निषेध करीत असल्याचेही वाघमारे म्हणाले.