‘मुन्नाभाई 3’मध्ये काम करायला मला आवडले, पण एका अटीवर

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘मुन्नाभाई 3’ याचवर्षी येणार आहे. खुद्द अर्शद वारसी याने याचा खुलासा केला होता. काल या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी आली. ती म्हणजे, निर्माता विधू विनोद चोप्रा या चित्रपटात सोनम कपूरला घेऊ इच्छितात. आता आणखी एक ताजी बातमी आली आहे. त्यानुसार, सोनम ‘मुन्नाभाई 3’ करायला तयार आहे पण एका अटीवर.

सोनम सध्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशाच एक प्रमोशनल इव्हेंटमध्ये सोनमला ‘मुन्नाभाई 3’बद्दल छेडले गेले. यावर ती बोलली ‘मुन्नाभाई 3’मध्ये काम करायला मला आवडले. पण एका अटीवर. ती म्हणजे, या चित्रपटाचे नाव ‘मुन्नाभाई 3’ऐवजी ‘मन्नी बहन’ असेल तरच, असे सोनम म्हणाली. आता सोनमला यावरून काय सुचवायचे आहे, हे तीच जाणो.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

You might also like