किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल – सुरेखा पुणेकर

बिग बॉस सीझन दोनमधून बाहेर पडलेल्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. “किशोरी शहाणे ही माझ्यावरती जळत होती.  इतर कलाकार मला इज्जत देत असताना ती जळायची. किशोरी शहाणे विषयी मला आदर नाही आणि यापुढेही नसेल. ती पण लवकर बिग बॉसमधून बाहेर पडेल”, असे सुरेख पुणेकर यांनी सांगितलं आहे.

बिग बॉस मराठी सिझन 2 मधून सुरेखा पुणेकर बाहेर पडल्यानंतर एका न्यूज चॅनेलने खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी बिग बॉसच्या घरातील अनुभव सांगितले. बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांना कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या? कोणत्या गोष्टी खटकल्या, अंतिम टप्प्यातील दावेदार कोण असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे. मात्र बिग बॉस झालं आता लढाई विधानसभेसाठी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.

You might also like