बॉलीवूड स्टार शाहीद कपूर याचा सावत्र भाऊ ईशान खट्टर म्हणतो की, आयुष्यातील कोणत्याही गोष्टीसाठी मला कधीही जास्त दडपण येत नाही. या नवोदित अभिनेत्याकडे मीरा नायरची बीबीसी सीरीज “अ सुटेबल बॉय’ आहे. याशिवाय त्याने बॉलीवूड ऍक्शन ड्रामा “खाली पीली’ आणि नुकताच जाहीर केलेला हॉरर कॉमेडी “फोन भूत’ हा चित्रपट देखील साईन केला आहे.
दडपणाविषयी बोलताना एका मुलाखतीत ईशान म्हणाला, फार जास्त तर नाही, परंतु चित्रपटांचा मुख्य नायक म्हणून काम करताना थोडे दडपण हे येत असते, पण मला ते दडपण म्हणून दिसत नाही.
माझ्यासाठी हे दडपण व्यासपीठावर स्वतःला व्यक्त करण्याची खूप उत्सुकता आणि संधींसह येते. ते उत्तम आहे, परंतु मला खूप दबाव वाटत नाही. ईशानच्या मते प्रेक्षक त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे महत्त्वाचे आहे. तो म्हणाला, “जर आपण आपले काम चांगले केले तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. दरम्यान, “अ सूटेबल बॉय’मध्ये ईशान राजनीतीतज्ज्ञ महेश कपूर (राम कपूरद्वारा अभिनीत)चे विद्रोही पुत्र मान कपूरची भूमिका साकारत आहे