दिशाला मी ओळखत सुद्धा नाही – सुरज पांचोली

दिशा सालियनने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.तिच्या निधनानंतर कलाविश्वात मोठी खळबळ निर्माण झाली होती. केवळ इतकंच नाही तर अभिनेता आदित्य पांचोली यांच्या मुलावर सूरज पांचोलीवर काही आरोपही करण्यात आले होते. या प्रकरणी सूरजने त्यांच मौन सोडलं असून त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर सूरज पांचोलीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. दिशा आणि सूरज एकमेकांसोबत सिक्रेट रिलेशनशीपमध्ये होते, असं म्हटलं जात आहे. मात्र या साऱ्यावर सूरजने संताप व्यक्त केला आहे.

“सुशांत सिंह राजपूतसोबत माझं भांडण किंवा मारामारी का होईल? माझं आणि त्याचं कधीच कोणतं भांडण झालं नव्हतं. यापूर्वीदेखील मी याविषयी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि तसंच सलमान खान माझ्या वैयक्तिक आयुष्यात का हस्तक्षेप करेल? त्याच्याकडे दुसरं काम नाहीये का? मला हेसुद्धा माहित नाही की दिशा कोण आहे. मी कधीही दिशाला भेटलो नाहीये. सुशांतच्या आत्महत्येनंतर मला दिशाच्या मृत्युविषयी समजलं आणि तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे”, असं सूरजने सांगितलं.

सुशांतची एक्स मॅनेजर सुरज पांचोलीच्या बाळाची आई बनणार होती ?

You might also like