मी अनेक गोष्टी केल्यात पण सुदैवानं माझं नाव #MeToo मोहिमेत गोवलं नाही

‘सुदैवानं माझं नाव #MeToo मोहिमेत गोवलं नाही, मी अनेक गोष्टी केल्यात पण आतापर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत’, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे.
एका कार्यक्रमात #MeToo मोहिमेबद्दल शत्रुघ्न सिन्हा भाष्य केलं. ‘आजच्या काळात यशस्वी माणसाला उद्ध्वस्त करण्यामागे एक स्त्री आहे हे सांगण्यास मला अजिबात संकोचलेपणा वाटणार नाही. या मोहिमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध माणसांना महिलांनी उद्ध्वस्त केलंय हे मला जाणवलं.’असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. मी या मोहिमेची खिल्ली उडवत नाही त्यामुळे माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नये असंही शस्त्रूघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केलं.
‘मी अनेक गोष्टी केल्यात पण सुदैवानं मी मीटुच्या तडाख्यातून वाचलो. माझं नाव या मोहिमेतून बाहेर आलं नाही हिच माझ्यासाठी सुदैवाची बाब आहे. मी माझ्या पत्नीचं नेहमीचं ऐकतो ती माझी सुरक्षाकवच आहे. ‘,असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाची गोष्ट सांगणार ‘भेद’ चित्रपट
- ‘व्हॉट्सॲप लव’ चित्रपटातील ‘शोना रे’ गाणे प्रदर्शित
- ‘रॉकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
- ‘दया बेन’ नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट