मी सलमानला खूप घाबरतो ; सुशांतचा ‘तो’ जुना व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्याशी निगडीत अनेक जुन्या गोष्टी समोर येत आहेत. तर नुकतच सुशांतचा एक जुना व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये सुशांत सलमान खानविषयी बोलताना दिसतोय.इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पहायला मिळत आहे. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे.मुख्य म्हणजे या व्हिडीओमध्ये सुशांत, ‘मी सलमानला खूप घाबरत असल्याचं’ म्हणतोय .

सध्या सुशांतचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे.या व्हिडीओमध्ये सुशांतला सलमानबद्दल विचारलं असता, तो एक मोठा स्टार असल्याचं तो म्हणतो. व्हिडीओ मध्ये सलमान सुशांतच्या मागे उभा असल्याचं दिसंतय. आणि या कारणामुळे सुशांत थोडासा नर्व्हस दिसून येतोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुशांतला वरिष्ठ कलाकांराचा आदर असल्याचं लिहिलंय.

You might also like