मी टीव्ही अभिनेत्री असल्याचा मला गर्व आहे – मौनी रॉय

बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच मौनी रॉयला वेगवेगळ्या चित्रपटातून विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. २०१९ या वर्षात मौनी रॉयचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आपल्या करियरच्या सुरूवातीलाच इतक्या लवकर चागंल्या भूमिका मिळतील याची अपेक्षा नसल्याचं मौनीने म्हटलंय. ‘गोल्ड’ चित्रपटातून मौनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

२०१९मध्ये मौनीचे ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ते चित्रपट म्हणजे ‘रोमियो अकबर वॉल्टर’ ,’मेड इन चायना’ आणि ‘ब्रम्हास्त्र’ आहे. मौनीने ‘आगामी तीनही चित्रपट अतिशय मनोरंजक आहेत. तीनही चित्रपटातील माझ्या भूमिका अतिशय वेगळया आहेत.

‘मी टीव्ही अभिनेत्री असल्याचा मला गर्व आहे. मी आज जे काही आहे ते त्यामुळेच आहे. आगामी चित्रपटांचा भाग असल्याचा मला आनंद आहे परंतु, टीव्ही किंवा वेबवर काही मनोरंजक असेल तर तिथे काम करायला मला नक्की आवडेल. मला एकाच प्रोजेक्टसाठी वर्षभर, १० महिने काम करायचं नाही. जर मला तीन-चार महिन्यांचा प्रोजेक्ट मिळाला तर तो मी करेन’ असं तिनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like