मी एक अभिमानी भारतीय मुस्लीम आहे – शोएब इब्राहिम

“ससुराल सिमर’ फेम शोएब इब्राहिम याने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी थेट संपर्क साधला होता. याप्रसंगी इन्स्टा स्टोरीवर त्याने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने शोएबला एक विचित्र असा प्रश्न विचारला. पण या प्रश्नाला त्याने खूपच सुंदर उत्तर दिले.एका पाकिस्तानी चाहत्याने शोएबला विचारले की, एक मुस्लीम असल्याने तुला कधी भारतात असुरक्षित वाटले का?
यावर उत्तर देताना शोएब म्हणाल, मला असे कधीही वाटले नाही. मी एक अभिमानी भारतीय मुस्लीम आहे. शोएब इब्राहिमच्या या उत्तराने सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. या प्रश्नोत्तरात त्याला असेही विचारण्यात आले की तुझी बायको दीपिका कक्कडची कोणती भूमिका तुला सर्वाधिक आवडली, सिमर का सोनाक्षी? यावर शोएबने सिमरची निवड केली.
दरम्यान, याच शोच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. ज्यानंतर शोएब-दीपिका यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. शोएब आणि दीपिका हे टीव्ही वर्ल्डवरील मोस्ट पॉप्युलर कपल आहे. या जोडीला खूपच पसंती मिळत असते. इन्स्टावर दोघेही सतत फोटो शेअर करत एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात.