मी सगळ्यांचे कौतुक करते, पण माझे कुणीच कौतुक करत नाही

आज कंगना राणौतचे असंख्य चाहते आहेत. अनेक मोठ-मोठे प्रोजेक्ट तिच्याकडे आहेत. पण याऊपरही कंगना इंडस्ट्रीत स्वत:ला असुरक्षित समजते. इंडस्ट्रीने अद्यापही आपला स्वीकार केला नाही, असे तिला जाणवते. अलीकडे एका मुलाखतीत कंगनाने हे बोलून दाखवले.

मी माझ्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रींची प्रशंसा करताना जराही कचरत नाही.अभिनेता असो वा अभिनेत्री त्याचे कौतुक करताना मी घाबरत नाही. सोनाक्षी सिन्हाचा ‘लुटेरा’ पाहिल्यावर मी वर्षभर तिचे कौतुक केले. असे असताना माझी प्रशंसा करताना मात्र लोक कचरतात. अशावेळी असे का? असा प्रश्न मला पडतो. इंडस्ट्री माझ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असेचं मला वाटते. माझे चित्रपट चालतात, ‘मणिकर्णिका’ला कोट्यवधी व्ह्युज मिळतात, याऊपरही कुणाच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द बाहेर पडत नाही. माझ्या चित्रपटाचा ट्रेलर वा टीजर पाहून एकही बोलत नाही. यावरून माझे काही अस्तित्वचं नाही, असे मी मानायचे का? असा सवाल कंगनाने केला.

कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
कंगनाशिवाय अतुल कुलकर्णी, कुलभूषण खरबंदा, अंकिता लोखंडे, डॅनी डेन्जोंगपा, सुरेश ओबेरॉय दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like