सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी गांधी जयंतीनिमित्त उपोषण करा; कोरिग्राफरचं चाहत्यांना आवाहन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आता दोन महिने जास्त उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी कोरिओग्राफर गणेश हिवारकर थेट उपोषणाला बसणार आहे.सुशांतच्या मृत्यूमुळे त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीला आणखी गती प्राप्त व्हावी यासाठी तो उपोषण करणार आहे.

“मी आणि अंकित गांधी आम्ही येत्या दोन ऑक्टोंबरला उपोषण करणार आहोत. आम्हाला या आंदोलनासाठी गांधीजींचा आशिर्वाद हवा आहे. त्यामुळे आम्ही इंदिरा गांधी विमानतळावरुन राजघाट पर्यंत पदयात्रा करणार आहोत. तुम्ही देखील या उपोषणात सहभागी व्हा.” अशा आशयाची इन्स्टाग्राम त्याने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

You might also like